नेटबॉल स्पर्धेत पुणे संघाला विजेतेपद, छत्रपती संभाजीनगर टीम उपविजेती

  • By admin
  • November 2, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र एमेच्योर नेटबॉल असोसिएशन मान्यताप्राप्त १९ वी महिला व पुरुष महाराष्ट्र राज्य वरिष्ठ नेटबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुरुषांचे २७ आणि महिलांचे १८ संघ सहभागी झाले होते. 

पुरुष गटातील अंतिम सामन्यात पुणे विरुद्ध छत्रपती संभाजीनगर अशी लढत रंगली. सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा राहिला. अखेरीस १४–१३ अशा एका गुणांच्या फरकाने पुणे संघाने विजेतेपदावर कब्जा केला. दोन्ही संघांनी उत्तम कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.महिला गटाच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने उत्कृष्ट खेळ करत धुळे संघाचा १६–०८ असा सहज पराभव करून विजेतेपद जिंकले. तृतीय क्रमांक लढतीत, पुरुष गटात परभणी संघाने लातूरवर मात करत तृतीय स्थान पटकावले, तर महिला गटात परभणी संघाने चंद्रपूरचा पराभव करत तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. आप्पासाहेब शेळके (सहसचिव, नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया), निरीक्षक लक्ष्मण दातीर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पंच विवेक सेन, नोबल प्रकाशनचे के के भुतेकर, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष सतीश इंगळे, महासचिव शालिनी आंबटकर, उपाध्यक्ष योगेश वाघ, मिनेश महाजन, कोषाध्यक्ष विनय मून, सहसचिव सुशांत सूर्यवंशी, सदस्य नरेश कळंबे, शशिकला शालीन, शोभा मठपती, अमोल उरेल, शेख चांद आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय विविध जिल्ह्यातील सचिव डॉ एस एन मुर्ती, संभाजी गायकवाड, राजुभाई, प्रमोद पाटील, समीर सीखलकर, रामदास गिरी, विनय जाधव, जुबेर शेख, प्रवीण कुपटीकर, विठ्ठल महाले, रामेश प्रधान आदींची उपस्थिती लाभली.

नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय नेटबॉल विकास समितीचे अध्यक्ष हरिओम कोशिक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच उपसंचालक शेखर पाटील, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई आणि गणेश पळवदे यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन दांडगे, संकेत बोंगारगे, अनिल मोटे, शुभम गायकवाड, हर्षवर्धन मगरे यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.ही स्पर्धा खेळाडूंसाठी कौशल्य प्रदर्शनासोबत राज्य स्तरावर नेटबॉलचा प्रसार आणि विकासाची दिशा दाखवणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *