छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी येथील सक्सेस इंटरनॅशनल स्कूलच्या आराध्या योगेश नवले हिने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत १४ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाची कमाई केली.
स्पर्धेत आराध्याने उत्कृष्ट संतुलन, ताकद आणि कलात्मक सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.आराध्याच्या विजयानंतर शाळेचे अध्यक्ष संदीप लगामे पाटील, संचालिका व मुख्याध्यापिका विजयश्री बारगळ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी रामकिशन मायंदे, गोकुळ तांदळे, राऊत सर, बजाज मॅडम, प्रवीण आव्हाळे यांनी तिचा सत्कार करून कौतुक केले.
या यशामागे प्रशिक्षक श्याम अंभोरे यांचे काटेकोर प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. आराध्यालाच नव्हे तर शाळेलाही पुढील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अधिक पदके मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



