छत्रपती संभाजीनगर ः जिल्हास्तरीय आंतर शालेय नेटबॉल स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूल मुलींच्या संघाने १४ व १९ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
क्रीडा व युवक सेवा संचानालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात ऑक्सफर्ड स्कूलचा ६-३ ने पराभव केला. तसेच १९ वर्षांखालील गटात मुलीच्या संघाने अंतिम सामन्यात सेंट जॉन्स शाळेचा ८-३ विजय मिळवला आणि जेतेपद संपादन केले.
या शानदार कामगिरीमुळे शाळेचे दोन्ही संघ परभणी येथे होणाऱ्या विभागीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या खेळाडूंना डॉ रोहिदास गाडेकर , समाधान बिलेवार, सिद्धांत श्रीवास्तव, श्रीराम गायकवाड, अभिजीत तुपे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या घवघवीत यशाबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संचालक रंजीत दास, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता दामोदधरन, किरण चव्हाण, सुपरवायझर हसमत कौसर, मजेदा खालिद, माधुरी सूर्यवंशी, शेख अफरोज व शिक्षक वृंद अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत.



