शालेय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत विजय पाटील, वेद अभ्यंकर व अनुष्का कांबळेला सुवर्णपदक 

  • By admin
  • November 2, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : शालेय महानगरपालिका अंतर्गत आयोजित मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी दमदार कामगिरी सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जलतरण तलाव व ४०० मीटर ट्रॅक येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला.

मॉडर्न पेंटॅथलॉन या प्रकारात १९ वर्षे वयोगटात १६०० मीटर धावणे – ३०० मीटर पोहणे – पुन्हा १६०० मीटर धावणे, तर १७ वर्षे गटात १२०० मीटर धावणे – २०० मीटर पोहणे – पुन्हा १२०० मीटर धावणे अशा आव्हानात्मक स्वरूपाच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ फुलचंद सलामपुरे, ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक किरण शुरकांबळे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक गोकुळ तांदळे, क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, प्रसाद अभ्यंकर, अ‍ॅड अर्शद यारखान, प्रियांका गारखेडे व महेश फुले उपस्थित होते.

स्पर्धेचे पंच म्हणून एन फडके, संतोष अवचार, सचिन बोर्डे, एस मनीषा, यश थोरात आणि रोहित यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मानवत (परभणी) येथे होणाऱ्या विभागीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

अंतिम निकाल

१७ वर्षे मुले
१) वेद अभ्यंकर
२) श्लोक भयंकर
३) अहमद यारखान
४) एफन यारखान

१७ वर्षे मुली
१) अनुष्का कांबळे
२) प्रलाशा सरकटे
३) लक्ष्मी पवार

१९ वर्षे मुले
१) विजय पाटील
२) ओम गाडेकर
३) श्रेयस गायकवाड
४) लक्ष खरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *