छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धा व निवड चाचणी उत्साहात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा संघटनेचे सहसचिव भिमराज राहणे, नॅशनल पंच आशुतोष खिची, धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ विठ्ठल नरके व भारत रेड्डी उपस्थित होते.
या प्रसंगी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी धनुर्विद्येच्या वाढत्या संधींबाबत मार्गदर्शन करत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. जिल्ह्यातील प्रतिभावान धनुर्धारकांची निवड करून संघ जाहीर करण्यात आला असून निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, सहसचिव भिमराज रहाणे, डॉ हरीश नागदकर, ममता खिची, आशुतोष खिची, अरुणा राहणे, अशोक जंगमे, विठ्ठल नरके, विशाल वाघचौरे, दीपक सुरडकर व विक्रम लाहोट यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
धनुर्विद्या क्षेत्रात जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहता आगामी स्पर्धांमध्ये उत्तम यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा संघात निवड झालेले खेळाडू
इंडियन राऊंड – मुले ः कौस्तुभ देव, ओमराज भालेकर, शंतनु सोळुंके, रोहन नागरे, साहिल रोकडे, जीयान खान.
इंडियन राऊंड – मुली ः डिंपल बडगुजर, दिव्या केदारे, प्रांजली लांबट, शरयू सोनावणे.
कंपाउंड राऊंड – मुले ः अर्णव माने.
रिकर्व राऊंड – मुले ः कबीर गायकवाड, साईराज उणे, सुमित बरंडे, धिमय पाटील



