ओम यादव, निर्भय भोईर, आरती खोडदे, योगिनी म्हात्रे कर्णधारपदी
ठाणे ः ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने पुणे येथे ५ नोव्हेंबरपासून होणाऱ्या ३६व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी शहर व ग्रामीण किशोर व किशोरी गटाचे संघ जाहीर केले.
मावळी मंडळाच्या ओम यादव याच्याकडे ठाणे शहरच्या, तर उजाला मंडळ – वळ च्या निर्भर भोईर याच्याकडे ठाणे ग्रामीणच्या किशोर गटाचे नेतृत्व सोपविण्यात आले. किशोरी गटात ही जबाबदारी आर एफ नाईक (अ) संघाच्या आरती खोडदे (ठाणे शहर) व शिवकन्या संस्थेच्या योगिनी म्हात्रे (ठाणे ग्रामीण) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.
निवडण्यात आलेले संघ
ठाणे शहर किशोर गट : ओम यादव (कर्णधार), अजित वर्मा, यश पारले, अभिमन्यू यादव, अभय वर्मा, ओम चव्हाण, अमितेश राठोड, आकाश निशाद, कृष्णा सनोदिया, यश घडशी, परमिंदर प्रसाद, कायाण सणस, निखिल गोटेकर, श्रवण जाचक. प्रशिक्षक अजित भोसले, व्यवस्थापक सदानंद चिकशेट्टी.
ठाणे शहर किशोरी गट : आरती खोडदे (कर्णधार), गौरी जुन्द्रे, वैभवी दूरकर, आर्या गुरव, वैभवी सिंह, सुहानी सिंह, आरती गौड, नेहा भाबड, सृष्टी फडतरे, श्रेया साळुंखे, सोनम पंडित, श्रद्धा गोडसे, स्वरांगी हुले, सानिका म्हात्रे. प्रशिक्षिका मेघना खेडेकर, व्यवस्थापिका रेखा चिकणे.
ठाणे ग्रामीण किशोर गट : निर्भय भोईर (कर्णधार), सुरज यादव, राजवीर काळवीट, कन्हैया कामत, रितेश भांडे, केतन गीते, राज भारती, सम्यान पवार, युग तरे, प्रियांशु राजपूत, वेदांत शिंदे, श्लोक पाटील, जित पाटील, देवांश सिंग. प्रशिक्षक शिवदास पाटील, व्यवस्थापक सुधाकर चौगुले.
ठाणे ग्रामीण किशोरी गट : योगिनी म्हात्रे (कर्णधार), श्रावणी कुंभार, वैभवी रायते, भाविका शेलार, तेजश्री साळुंखे, भार्गवी दळवी, मनश्री कांबळे, कोमल राठोड, रिंकी जैस्वाल, संस्कृती साळवे, रोशनी चौहान, स्नेहा माळवे, धनश्री कांबळे, गुंजन खाडे. प्रशिक्षक मनोज शिंदे, व्यवस्थापिका नीता वरगरे.



