पुणे ः महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय सिलंबम प्रशिक्षण शिबिर व पंच परीक्षा २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल, माळे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातून ५५ खेळाडू व परीक्षार्थींनी सहभाग नोंदवत सिलंबम क्रीडा प्रकारातील कौशल्य वृद्धीबरोबरच पंचिंगच्या तांत्रिक बारकाव्यांचे प्रशिक्षण घेतले. शिबिरात सहभागी खेळाडूंना मूलभूत तंत्र, शस्त्र तंत्र, स्वसंरक्षण, पचिंग नियम, स्कोअरिंग सिस्टीम, डेमो प्रेझेंटेशन यांचे व्यावहारिक व सैद्धांतिक प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरात खेळाडूंच्या प्रात्यक्षिकांसोबत पंच परीक्षेचे मूल्यांकनही करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका कळंत्रे मॅडम यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, निष्ठा आणि क्रीडामूल्य जपत सिलंबममध्ये पुढे जाण्यास प्रेरित केले.
या शिबिरात प्रणिष गायकवाड, मानसी भिसे, अथांग गोणेकर, प्रतीक्षा कांबळे, अवंती सकुंडे, सिद्धी सोनवणे, ज्ञानेश्वरी मोरे, देवश्री महाले, चंद्रशेखर महाले व शंतनू उभे यांनी प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
समारोप सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
समारोप सोहळ्यास ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे संस्थापक शिवलिंग कळंत्रे, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कुंडलिक कचाले, सिलंबम कोल्हापूर विभाग प्रमुख डॉ संजय जाधव, अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत राहींज, सांगली जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत देवकुळे, पुणे जिल्हा प्रतिनिधी चंद्रशेखर महाले, शंकर मालुसरे, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी सिद्धी सोनवणे, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शुभम महांकळे, जिल्हा प्रशिक्षक दीक्षा लोहार, प्रणोती पाटील, अजय सरोदे आणि दत्तात्रय कांबळे उपस्थित होते.
शिबिरात सहभागी सर्व ५५ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध प्रशिक्षण सत्रे आणि तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे सिलंबम प्रशिक्षण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात आदित्य माळी, श्लोक बाबर, साकेत बाबर, अनुज सातपुते, सत्यपाल सिंग राजपुरोहित, वेदांग हरके, प्रसन्न कंधारे, प्रीतेश राठोड, सोहम तावरे, महादेव पवार, वेदांत अंकले, प्रणव पांढरे, शौर्य कांबळे, ज्ञानेश्वर अलदार, अथर्व जाधव, अरव लुगडे, महेश पडळकर, अभय यादव, सुयश देवकुळे, पवन शिवरकर, रोहित गायकवाड, गणेश दिघे, सुयश घालमे, सागर लबडे, शुभम महांकाळे, पवन पाटील, बाळासाहेब पाटील, शुभम पाटील, पार्थ दरवान, रुद्राक्ष चट्टे, देवेंद्र चव्हाण, संतुष्ट जाधव, मनवा कासार, समिधा शिंदे, अनुष्का शिंदे, पिंकी पटेल, प्रज्ञा जाधव, काव्या राजपुरोहित, सानिया कंधारे, आर्या शेखरे, आशना चव्हाण, अवनी गवंडळकर, अध्या कांबळे, अर्चना दिघे, भाग्यश्री पोटे, अन्विता शेळके, समृद्धी जाधव, सिमरन देवकुळे, स्मिता काटकर, दीक्षा लोहार, श्रद्धा शिंदे, आराध्या पाटील, ऐश्वर्या कदम, ऋचा पाटील आणि अवनी चव्हाण यांचा समावेश आहे. या शिबिरामुळे महाराष्ट्रातील सिलंबम खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी अधिक सक्षम तयार होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.



