छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मल्लखांब क्रीडा स्पर्धेला ग्रामीण भागातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेचे तांत्रिक सहकार्य औरंगाबाद जिल्हा मल्लखांब असोसिएशनने केले.या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुला–मुलींनी सहभाग नोंदविला. जुने शहर विद्यालय वरुड काजी, स्वामी विवेकानंद विद्यालय जिथे पिंपळगाव, सक्सेस इंटरनॅशनल स्कूल, गोरक्षनाथ विद्यालय खामगाव, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, नाथ विद्यालय गल्ली बोरगाव, छत्रपती विद्यालय चिंचोली, आर्य चाणक्य विद्यालय यांसह अनेक शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे वरिष्ठ संघटक गोकुळ तांदळे व विनायक राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी राम मायंदे, संदीप लगामे, सुरेश पठाडे, राणा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच म्हणून प्रशांत जमदाडे, बजाज मॅडम, साईचंद्र वाघमारे यांनी उत्कृष्ट काम पाहिले, तर स्पर्धेचे संयोजन मोहित थोरात यांनी प्रभावीपणे सांभाळले.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील मल्लखांब क्रीडेला चालना मिळून ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.



