नांदेड ः महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अंतर्गत हिंगोली जिल्हा संघटनेच्या वतीने ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान आयोजित २४व्या सब ज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या नांदेड संघाची निवड सचिव वृषाली पाटील जोगदंड यांनी जाहीर केली.
रामलीला मैदान हिंगोली येथे होणाऱ्या २४व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत इंडियन राउंड मध्ये मुले-अर्णव सोळंके, आदित्य टोकलवाड, सिद्धांत सावंत, अथर्व शेट्टी, कृष्णा टोकलवाड यांचा समावेश आहे. मुलींच्या संघात सानवी दुर्गे, संस्कृती आरसुळे, रिकर्व्ह प्रकारात सिद्धेश गीते, अजिंक्य फाजगे, स्वराज कांबळे, प्रतीक फाजगे, सूर्या पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कंपाऊंड प्रकारात आराध्या जगताप, अक्षरा एरलावाड यांची निवड करण्यात आली असून जिल्हास्तर निवड चाचणीत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांदो संघटनेचे उपाध्यक्ष माधव सावकार बेळीकर, वृषाली पाटील जोगदंड यांनी केले. निवड झालेल्या खेळाडूंचे सिद्धेश्वर शेटे, प्रकाश फाजगे , सरदार हरविंदर संधू यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
नांदेडचा निवड झालेला संघ स्पर्धेसाठी ८ नोव्हेंबर रोजी रवाना होणार असून हिंगोली येथील स्पर्धेत निवडलेला महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनोज कोलते, संतोष चुनोडे, स्वयंम कांबळे, कृष्णा दुयेवाड, रवीकांत चव्हाण यांनी मेहनत घेतली.



