वनवर्ड गोल्फर्स बाय मनजीत प्राईड संघ चॅम्पियन

  • By admin
  • November 2, 2025
  • 0
  • 103 Views
Spread the love

एमजीएम गोल्फ लीग स्पर्धेचा शानदार समारोप

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम गोल्फ क्लबतर्फे आयोजित एमजीएम गोल्फ लीग सत्र २ मध्ये वनवर्ड गोल्फर्स बाय मनजीत प्राईड संघाने दमदार कामगिरीची छाप पाडत विजेतेपदावर नाव कोरले. 

रोमांचक वातावरणात झालेल्या अंतिम सामन्यात संघाने उत्कृष्ट स्ट्रोक्स, समन्वय आणि सातत्याच्या जोरावर ९ गुणांसह विजयी मुकूट पटकावला. सत्यम स्विंगर्स संघाने ७ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर झेन स्ट्रायकर्स संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विजेत्या संघातील जी श्रीकांत, गोपाकुमार आणि आशुतोष आढाव यांच्या नेतृत्वाखाली वनवर्ड गोल्फर्स संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. विजयानंतर संघाच्या खेळशैलीची सर्वत्र प्रशंसा झाली.

उत्कृष्ट खेळाडूंना गौरव

या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

  • गोल्ड कॅटेगिरी : रंजीत कक्कड, जी श्रीकांत, गोपाकुमार
  • सिल्वर कॅटेगिरी : अजित इंगोले, आशुतोष आढाव
  • ब्राँझ कॅटेगिरी : निलेश खेडकर, एस के अग्रवाल, रवि गुप्ता, डॅनियल सालढना

याशिवाय बेस्ट बिगिनर पुरस्कार नितीन बागडिया यांना प्रदान करण्यात आला.

टी-ऑफ पॉईंट सुशोभीकरण स्पर्धा ठरली आकर्षण

गोल्फ क्लब परिसरात टी-ऑफ पॉईंट सुशोभीकरण स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. कोब्रा डेंस संघाने आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सजविलेल्या टी-ऑफ पॉईंटसह प्रथम क्रमांक मिळवला. एमकेडीआय द्वितीय क्रमांकावर, तर तलाव परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करणाऱ्या वनवर्ड प्राईड संघाला प्रथम क्रमांकाचे स्वतंत्र पारितोषिक देण्यात आले.

भव्य बक्षीस वितरणाने सोहळ्याची शोभा वाढली

विजेत्या संघाला ५ लाख, तर उपविजेत्याला ३ लाख पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यास प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. या प्रसंगी जून शिरातोरी (प्रमुख वित्त अधिकारी, टोयोटा इंडिया), अनुरंग जैन (एमडी, इंडुरन्स टेक्नॉलॉजी), अंकुशराव कदम, जी श्रीकांत, डॉ विनय कुमार राठोड, आदित्य जीवने, डॉ अपर्णा कक्कड, सुजित कक्कड, अतुल विभांडिक, सलमान खान, नितीन बागडिया भूपेंद्रसिंग राजपाल, संचित राजपाल, राजेंद्रसिंग राजपाल आणि सुनील अग्रवाल यांची उपस्थिती होती.

या यशस्वी आयोजनात वृषाली घाटणे, संदीप ढंगारे, उमेश राऊत, रमझान शेख, अमन खान, श्रीधर कदम, काकाजी कोंडके यांच्यासह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.स्पर्धेतील सर्व खेळाडूंनी उत्साहपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. एमजीएम गोल्फ क्लब प्रशासनाने विजेते, उपविजेते व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *