छत्रपती संभाजीनगर ः ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या ईएमएमटीसी–एमएलटीए १४ वर्षांखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या अंशुल पुजारी, सारा फेंगसे आणि कर्नाटकच्या सानवी मोहन यांनी उल्लेखनीय विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अंशुल पुजारीने अव्वल मानांकित हिमाचल प्रदेशच्या अभिनव शर्माचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या यशवंतराजे पवारने राज्यातीलच तक्षक नगरचा ६-४, ६-३ असा पराभव केला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या सारा फेंगसेने अव्वल मानांकित शरण सावंतवर ६-३, ६-३ अशी मात केली. कर्नाटकच्या सानवी मोहनने १२वी मानांकित तेलंगणाच्या श्रेष्ठा दुग्यालाला ६-२, ६-३ असे हरवले.
अंतिम पात्रता – प्रमुख निकाल
मुले : अंशुल पुजारी (महा) विजयी विरुद्ध अभिनव शर्मा (हिमाचल) ६-०, ६-०, देवांश आचार्य (गुजरात) विजयी विरुद्ध आरव शाह (महा) ६-४, ६-३, विराज जारवाल (दिल्ली) विजयी विरुद्ध झियान मोहम्मद (तेलंगणा) ६-१, ३-६, १०-५, लक्ष्य त्रिपाठी (महा) विजयी विरुद्ध लव (महा) ७-६ (५), २-६, १०-४, आदित्य कायम (कर्नाटक) विजयी विरुद्ध शुभ नाहाटा (महा) ७-६( ५), ६-२, रौनक सेठी (महा) विजयी विरुद्ध आवीर घुमरे (महा) ६-१, ०-६, १०-५, यशवंतराजे पवार (महा) विजयी विरुद्ध तक्षक नगर (महा) ६-४, ६-३.
मुली : सारा फेंगसे (महा) विजयी विरुद्ध शरण सावंत (महा) ६-३, ६-३, विक्सा गॅवीनोल्ला (तेलंगणा) विजयी विरुद्ध स्वरा जावळे (महा) ६-४, २-६, १०-५, त्रिशा भोसले (महा) विजयी विरुद्ध वाण्या अग्रवाल (महा) ६-२, ६-०, सानवी मोहन (कर्नाटक) विजयी विरुद्ध श्रेष्ठा दुग्याला (तेलंगणा) ६-२, ६-३.



