राज्य किशोर-किशोरी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा बुधवारपासून रंगणार

  • By admin
  • November 3, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

स्पर्धेची गटवारी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ३६वी राज्यस्तरीय किशोर व किशोरी गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ५ नोव्हेंबरपासून पुण्यात रंगणार असून पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे. राकेश घुले कबड्डी संघ यावर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.

गतवर्षी मनमाड (नाशिक) येथे झालेल्या स्पर्धेत परभणीने किशोर गटात विजेतेपदाची सहज कमाई केली होती, तर किशोरी गटात यजमान नाशिक शहराने चुरसपूर्ण लढतीत विजेतेपद पटकावले होते. दोन्ही गटात पिंपरी-चिंचवडने उपविजेतेपद मिळवले होते. यंदा स्पर्धा पुण्यात होत असल्याने पिंपरी-चिंचवड संघाला घरचा मैदानाचा लाभ मिळणार असून ते विजेतेपद जिकण्याचा प्रयत्न करतील असा उत्साह क्रीडाप्रेमींमध्ये दिसत आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये किशोर गटात परभणी-बीड, पिंपरी-चिंचवड-रायगड, रत्नागिरी-मुंबई उपनगर पूर्व हे सामने रंगतील, तर किशोरी गटात नाशिक शहर-ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड-नांदेड, परभणी-जळगाव यांच्यातील सामने उत्सुकतेचे ठरणार आहेत.

किशोर गट – गटवारी

अ गट: परभणी, जळगाव, बीड
ब गट : पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, रायगड, सोलापूर
क गट: रत्नागिरी, नांदेड, मुंबई उपनगर पूर्व, सिंधुदुर्ग
ड गट: जालना, पालघर, नाशिक शहर, हिंगोली
इ गट: ठाणे ग्रामीण, धाराशिव, नाशिक ग्रामीण, सातारा
फ गट: कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, मुंबई शहर पूर्व
ग गट: मुंबई उपनगर पश्चिम, अहिल्यानगर, लातूर, ठाणे शहर
ह गट: नंदुरबार, सांगली, मुंबई शहर पश्चिम, पुणे ग्रामीण

किशोरी गट – गटवारी

अ गट: नाशिक शहर, मुंबई उपनगर पश्चिम, ठाणे ग्रामीण
ब गट: पिंपरी-चिंचवड, नंदुरबार, नांदेड, बीड
क गट: परभणी, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर
ड गट: सांगली, ठाणे शहर, सातारा, छत्रपती संभाजीनगर
इ गट: पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, पालघर, धुळे
फ गट: नाशिक ग्रामीण, कोल्हापूर, लातूर, हिंगोली
ग गट: जालना, पुणे शहर, धाराशिव, सिंधुदुर्ग
ह गट: मुंबई उपनगर पूर्व, रायगड, मुंबई शहर पश्चिम, मुंबई शहर पूर्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *