छत्रपती संभाजीनगर ः ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए १४ वर्षाखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आरव छल्लानी, कौस्तुभ सिंग, गुरशान चहल , पुनीत एम यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या पंधराव्या मानांकित आरव छल्लानीने तेलंगणाच्या मोक्षघ्न तलाशिलाचा ६-१, ७-६ (२) असा पराभव केला. अव्वल मानांकित उत्तर प्रदेशच्या कौस्तुभ सिंग याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या कर्नाटकच्या आदित्य कामतला ६-१, ६-१ असे पराभूत केले.
चुरशीच्या लढतीत पंजाबच्या गुरशान चहल याने महाराष्ट्राच्या शौर्य गडदेचा २-६, ६-१, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव केला.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधिक्षक डॉ विनय कुमार(आयपीएस) आणि क्रीडा उप संचालक शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्सचे कॅप्टन कवी कंबन, अभिनव मिश्रा, एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर, मुख्य हेड अॅड आशुतोष मिश्रा, मुख्य प्रशिक्षक रामय्या कोंकट्टी, प्रवीण गायसमुद्रे आणि ईएमएमटीसीचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल मुख्य ड्रॉ : पहिली फेरी मुले
कौस्तुभ सिंग (उत्तर प्रदेश) विजयी विरुद्ध आदित्य कामत (कर्नाटक) ६-१, ६-१, कृतिक पुजाला (तेलंगणा) विजयी विरुद्ध देवांश आचार्य (गुजरात) ६-२, ६-४, आरव छल्लानी (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध मोक्षघ्न तलाशिला (तेलंगणा) ६-१, ७-६ (२), गुरशान चहल (पंजाब) विजयी विरुद्ध शौर्य गडदे (महाराष्ट्र) २-६, ६-१, ६-३, हीत कंडोरिया (गुजरात) विजयी विरुद्ध केम्पेगौडा मंजुनाथ (कर्नाटक) ६-०, ६-३, क्रिश बनिवाल (दिल्ली) विजयी विरुद्ध पुरनजय कुतवल (महाराष्ट्र) ७-५, ६-३, पुनीत एम (कर्नाटक) विजयी विरुद्ध हरिहरन महामुनी (तामिळनाडू) ६-१, ६-२, जेगन सेंथिल कुमार (तामिळनाडू) विजयी विरुद्ध रुत्विक राजदान ६-०, ६-३, नरेश प्रभू (तामिळनाडू) विजयी विरुद्ध श्रेयांश खेरा (हरियाणा) ४-६, ७-५, ६-३, सत्य चिंतागुंता (तेलंगणा) विजयी विरुद्ध लक्ष्य त्रिपाठी (महाराष्ट्र) ६-३, ६-३, विराज चौधरी (दिल्ली) विजयी विरुद्ध कहान भुवा ६-०, ६-०.



