शालेय कराटे स्पर्धेत रुद्र अकॅडमी, शिवस्मारक, ट्रेडिशनल कराटे क्लबचे चमकदार यश 

  • By admin
  • November 4, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

सोलापूर ः आंतर शालेय कराटे स्पर्धेत सोलापूर शहर व पुणे विभाग स्तरावर रुद्र अकॅडमी, शिवस्मारक व ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सर्व खेळाडू आपापल्या वजनीगटात विजेते ठरले.

स्पोर्ट्स कराटे बॅचची आर्या यादव ही संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावी मधील विद्यार्थिनी एकोणीस वर्षाखालील मुली बावन्न किलो खालील वजनगटात तर सतरा वर्षाखालील मुले सत्तर किलो खालील वजन गटात ऋतुराज साठे हा बी एफ दमाणी प्रशालेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी राज्य स्तरीय स्पर्धेसाठी विभागाचे प्रतिनिधित्व करतील.

सर्व यशस्वी कराटेपटूंना राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक मिहिर सुरेश जाधव तसेच रुद्रच्या सात रस्ता शाखा व दमाणी प्रशालेचे प्रशिक्षक आकाश झळकेनवरु यांनी प्रशिक्षण दिले असून संचालिका संगीता सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

शहर स्तरावर यशस्वी कराटेपटूअंश सोलसकर (यशोधरा कनिष्ठ महाविद्यालय), तेजस तुरेराव (गांधीनाथा हायस्कूल), तन्मय बहिरवाडे (सिद्धेश्वर इंग्रजी मीडियम स्कूल),  कौशल तापडिया (महेश इंग्रजी मीडियम स्कूल), सिद्धराज कुलकर्णी (संगमेश्वर पब्लिक स्कूल), श्रेयस कवीटकर (मॉडर्न स्कूल), अक्षिता कुलकर्णी (माॅडेल पब्लिक स्कूल), लहर सज्जन, सानवी वाळवेकर (आय एम एस), शिवम डोईजोडे,  क्षितिज जाधव, यशदीप देशपांडे,  प्राची ताकभाते, ऋतुजा मोरे, स्वरा ताकभाते (दमाणी प्रशाला).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *