बीड ः जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेसाठी चॅम्पियन्स अकॅडमी बीड व बीड जिल्हा संघटनेचा राष्ट्रीय खेळाडू ओंकार राजू परदेशी याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ६९ वी राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धा जम्मू काश्मीर येथे ९ ते १३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. १९ वर्षे वयोगटात होणाऱ्या या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी ओंकार परदेशीची राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. या निमित्ताने त्याचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या हस्ते करण्यात आला. बीड जिल्हा क्रीडा संकुलातील डॉ अविनाश बारगजे यांच्या चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमीचा हा खेळाडू आहे.
जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक डॉ योगेश क्षीरसागर, डॉ सारिकाताई क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, डॉ अविनाश बारगजे, जया बारगजे, बन्सी राऊत, भरत पांचाळ, डॉ विनोदचंद्र पवार, मनेश बनकर, सुनील राऊत, प्रसाद साहू, बालाजी कराड यांच्यासह जिल्हा संघटनेच्या सर्व वरिष्ठ खेळाडू अधिकारी सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



