छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलच्या मुलांनी दुहेरी विजेतेपद पटकावण्याचा अभिमानास्पद मान मिळवला.
१४ वर्षाखालील गटात पोलीस पब्लिक स्कूल संघाने अंतिम सामन्यात दमदार खेळ करत ऑक्सफर्ड स्कूलवर ९-४ असा विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले. तसेच १९ वर्षाखालील गटात कौशल्यपूर्ण खेळ सादर करत सेंट जॉन्स स्कूल संघाचा ९-३ असा पराभव करत दुसऱ्या संघानेही विजेतेपद आपल्या नावावर केले. या दोन्हीही विजयी संघांनी परभणी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
दोन्ही संघांना डॉ रोहिदास गाडेकर, समाधान बेलेवार, सिद्धांत श्रीवास्तव, श्रीराम गायकवाड आणि अभिजीत तुपे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार, संचालक रंजीत दास, मुख्याध्यापिका गीता दामोदरन यांसह किरण चव्हाण, सुपरवायझर हसमत कौसर, मजेदा खालिद, माधुरी सूर्यवंशी, शेख अफरोज व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
दुहेरी विजेतेपदामुळे पोलीस पब्लिक स्कूलने जिल्हा नेटबॉलमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले असून विभागीय स्पर्धेतही या संघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विजयी संघ
१४ वर्षाखालील संघ
शिवम सानप, मोहर्ष शिंदे, अथर्व नागझरे, आर्यन कांबळे, पार्थ गाडेकर, कृष्णा पोहनकर, कार्तिक काकड, आदित्य पराशर, अजिंक्य पराशर, अवनीश बागुल, श्रेयस झाल्टे, अर्णव साखरे.
१९ वर्षाखालील संघ
पवन पवळे, जय जाधव, रुद्र पाटील, रुद्र मोरे, आदित्य झोंड, रुद्र ठाकूर, वेदांत देवरे, प्रज्वल चंदनसे, विराज जाधव, देवेन बनसोड, रिझान बेग, समर्थ मळेकर.



