राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ऋषिकेश माने, अंशुल पुजारी यांचे सनसनाटी विजय

  • By admin
  • November 5, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः ईएमएमटीसीतर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेने होत असलेल्या ईएमएमटीसी – एमएसएलटीए १४ वर्षाखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋषिकेश माने, अंशुल पुजारी यांनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत मंगळवारचा दिवस गाजवला.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगर महाराष्ट्राच्या ऋषिकेश माने याने पंजाबच्या सातव्या मानांकित आदेशबीर घुमानचा ६-२, ६-० असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अंशुल पुजारीने तेराव्या मानांकित तेलंगणाच्या निकुंज खुराणाचा २-६, ७-६ (२), ७-५ असा कडवा प्रतिकार केला. पंधराव्या मानांकित महाराष्ट्राच्या आरव छल्लानीने दिल्लीच्या क्रिश बनिवालचे आव्हान ६-१, ६-१ असे मोडीत काढले.

मुलींच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या सृष्टी सूर्यवंशी हिने तेलंगणाच्या हर्षिका चमंथुलाचा ६-१, ६-१ असा तर क्वालिफायर महाराष्ट्राच्या सारा फेंगसेने आसामच्या अभिप्सा गोगोईचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव करून दुसरी फेरी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *