मुंबई ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई या अधिकृत संघटनेशी संलग्न असलेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई या संघटनेतर्फे माजी अध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या स्मरणार्थ २४वी कॅडेट व सिनिअर जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा व १० वी कॅडेट व सिनिअर पुमसे स्पर्धा १० नोव्हेंबर रोजी सेंट अँथनी हायस्कूल, खैरानी रोड, साकीनाका येथे आयोजित करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या नियमा प्रमाणे होतील. या स्पर्धेत सबर्बन मुंबई जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घेण्यात यावा. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू हे जळगाव येथे होणाऱ्या कॅडेट व सिनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सबर्बन मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अधिक माहितीसाठी संदीप चव्हाण (सचिव) ८१६९६५६१८८, कल्पेश गोलांबडे (खजिनदार) ९५९४५९४४४५५ यांच्याशी संपर्क करावा. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबईचे नव निर्वाचित अध्यक्ष संदीप येवले यांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे सर्वांना आवाहन केले आहे.



