कल्याण : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) प्रायोजित, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने तसेच ठाणे जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘अस्मिता खेलो इंडिया सायकलिंग लीग’ स्पर्धेचे कल्याण येथे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १०० हून अधिक महिला सायकलपटूंनी सहभाग नोंदवत मोठा प्रतिसाद दिला. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक सुदाम रोकडे यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेचे आयोजन अधिक यशस्वी आणि सुरळीत पार पडले.
उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट ओमकार शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अभिजीत शिंदे व रुपाली रेपाळे, क्रीडा अधिकारी सिद्धार्थ वाघमारे, क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका), तसेच उपमुख्याध्यापक प्रमोद पारसी उपस्थित होते.
स्पर्धा महिला विभागात तीन गटांत – सिनियर, ज्युनियर आणि सब-ज्युनियर – घेण्यात आल्या. अनुक्रमे २० किमी, १० किमी आणि ५ किमी अंतराच्या या स्पर्धांमध्ये पुढील विजेत्यांनी चमकदार कामगिरी केली:
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चिंतामण पाटील, राकेश ठाकरे, अक्षय टेंभे, शुभम मोहपे, कृष्णा माळी, विजय सिंह, गजानन वाघ, स्वामिनाथन अय्यर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच नीता बोरसे आणि हर्षल सरोदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
ही माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक व ठाणे जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव डॉ यज्ञेश्वर बागराव यांनी दिली. स्पर्धेमुळे ठाणे जिल्ह्यात महिला सायकलिंगला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सिनियर महिला गट ः १. केनीस डी’मेलो (52:12.768), २.) नयना अहरकर (57:03.112), ३. हर्षल सरोदे (59:25.962).
ज्युनियर महिला गट ः १. एवना गिगूळ (26:15.965), २. गार्गी पाटील (29:01.562), ३. उत्कर्षा पारसी (30:12.109).
सब-ज्युनियर महिला गट ः १. स्वरा मिठारी (26:15.965), २. श्रीनीथी कुमार (29:01.462), ३. बुरशाला फातिमा शेख (30:12.109).



