सई ताम्हाणेकर, आर्यन भोजने कर्णधारपदी
मुंबई ः महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने होणाऱ्या ३६व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर संघाची निवड करण्यात आली आहे. मुंबई उपनगर पूर्व विभाग किशोरी गटाच्या कर्णधारपदी सई ताम्हाणेकर, किशोर गटाच्या कर्णधारपदी आर्यन भोजने यांची निवड करण्यात आली आहे.
बोपखेले, पुणे येथे ५ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. प्रथम किशोरी (मुलींचे) गटाचे सामने होतील. मुंबई उपनगर (किशोरी गट) पूर्व विभाग मुलींच्या संघात सई ताम्हाणेकर (कर्णधार), सायली सकपाळ (उपकर्णधार), आरुषी यादव, सानिका ढवळे, रिया चांदोरकर, पल्लवी जाधव, खुशी प्रजापती, श्रीप्रिया रामन, हिरल टांक,स्फूर्ती शेंडगे, मनस्विनी पवार, उन्नती शेलटकर, प्रियांशी बनिया, निहारिका मर्चंट यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक रमेश जावळे व संघ व्यवस्थापक चित्रा संधू हे आहेत.

मुंबई उपनगर (किशोर गट) पूर्व विभाग मुलांच्या संघात आर्यन भोजने (कर्णधार), साहिल यादव, हर्ष सिंग, विहान सिंग, उद्धव सकपाळ, चेतन सणस, स्मित गुदगे, शिवराज भगत, प्रीत सनस, चैतन्य चव्हाण, यश पाटील, सार्थक काळे, राज गुप्ता, विनायक राऊत यांचा समावेश आहे. संघ प्रशिक्षक पुनीत पुजारी आणि संघ व्यवस्थापक प्रभात पेडामकर हे आहेत.



