नवी दिल्ली ः अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला.
गुरुवारी फैसलाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत नऊ बाद २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४०.१ षटकांत फक्त दोन विकेट्स गमावून २७० धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानसोबत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दोन्ही संघ आता ८ नोव्हेंबर रोजी निर्णायक सामन्यात एकमेकांसमोर येतील.
डी कॉकने मोठी कामगिरी केली
दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉकने ३१ व्या षटकात त्याचे २२ वे एकदिवसीय शतक पूर्ण करून एक नवीन टप्पा गाठला. तो २१ शतके ठोकणाऱ्या हर्शेल गिब्सला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेचा तिसरा सर्वाधिक शतक करणारा फलंदाज ठरला.
डी कॉकने गेलला मागे टाकले
डी कॉकने पाकिस्तानविरुद्ध ११९ चेंडूत आठ चौकार आणि सात षटकारांसह १२३ धावांची नाबाद खेळी केली. यासह, डावखुरा फलंदाज आणखी एक विक्रम प्रस्थापित केला. तो आशियाई भूमीवर सर्वाधिक शतके झळकावणारा पाहुणा फलंदाज बनला. एबी डिव्हिलियर्स ४३ डावांमध्ये १० शतकांसह यादीत अव्वल स्थानावर आहे. डी कॉकने आता आठ एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या ख्रिस गेल याला मागे टाकले.
सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
२७ – हाशिम अमला
२५ – एबी डिव्हिलियर्स
२२ – क्विंटन डी कॉक
२१ – हर्शेल गिब्स
१७ – जॅक कॅलिस
आशियाई भूमीवर सर्वाधिक वन-डे शतके
१० – एबी डिव्हिलियर्स (४३ डाव)
९ – क्विंटन डी कॉक (३७ डाव)
८ – ख्रिस गेल (६० डाव)
७ – शाई होप (३१ डाव)



