ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत समृद्धी घाडीगावकरला विजेतेपद

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

ग्वाल्हेर ः ग्वाल्हेर येथे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत जैन इरिगेशनची समृद्धी घाडीगावकर हिने युवा मुलींच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात समृद्धीने महाराष्ट्राच्या केशर निर्गुण हिचा २–० अशा सरळ सेट्समध्ये पराभव करून सलग दुसरे राष्ट्रीय विजेतेपद मिळवले.उपांत्य फेरीत समृद्धीने तामिळनाडूच्या बरकत निसा हिच्यावर २–१ ने मात केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केशर निर्गुण हिने पेट्रोलियम स्पोर्ट्स संघाच्या व्ही मित्रा हिला पराभूत करून अंतिम फेरीत मजल मारली होती. उप-उपांत्य फेरीत समृद्धीने बिहारच्या शालू कुमारी हिचा २–० ने धुव्वा उडवला.

स्पर्धेनंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात कॅरम महासंघाच्या सचिव भारती नारायण, व्ही डी नारायण, प्रभजितसिंग बचेर, मदन राज, गुरिंदर सिंग, काशीराम आदी मान्यवर उपस्थित होते.समृद्धीच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, संचालक अतुलभाऊ जैन, क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, कॅरम व्यवस्थापक सैय्यद मोहसिन, क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *