राज्य कॅरम स्पर्धेत प्रशांत आणि समृद्धीला प्रथम मानांकन

  • By admin
  • November 7, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

मुंबई ः निळा परचुरे व मधुकाका परचुरे यांच्या स्मरणार्थ प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स गुहागर यांच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भंडारी भवन गुहागर येथे ८ नोव्हेंबर पासून राज्य कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरे प्रथम व ठाण्याच्या झैद अहमद फारुकी याला द्वितीय तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर हिला प्रथम व रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन ८ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता होणार असून पुरुष एकेरी गटाने सामन्याची सुरुवात होईल. स्पर्धेतील महत्वाचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून थेट प्रसारित करण्याची व्यवस्था असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. पुरुष एकेरी गटातील विजेत्या खेळाडू रोख रुपये २५ हजार व चषक तर महिला एकेरी गटातील विजेतील रोख रुपये ८ हजार व चषक देण्यात येणार असून प्रत्येक गटातील पहिल्या ८ खेळाडूंना रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. अंतिम फेरीचे सामने अनुक्रमे महिला एकेरी दुपारी २ वाजता व पुरुष एकेरी दुपारी ४ वाजता खेळविण्यात येतील.

स्पर्धेतील मानांकन

पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे (मुंबई), २) झैद अहमद फारुकी (ठाणे), ३) विकास धारिया (मुंबई), ४) सागर वाघमारे (पुणे), ५) अभिजित त्रिपनकर (पुणे), ६) समीर अन्सारी (ठाणे), ७) रियाझ अकबर अली (रत्नागिरी), ८) हरेश्वर बेतवंशी (मुंबई).

महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), २) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) मिताली पाठक (मुंबई), ५) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग), ६) अंबिका हरिथ (मुंबई), ७) रिंकी कुमारी (मुंबई), ८) सोनाली कुमारी (मुंबई).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *