छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आझाद महाविद्यालयात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत एस एफ एस हायस्कूलच्या १७ वर्षांखालील संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात त्यांनी एंजल किड्स इंटरनॅशनल शाळेला पराभूत केले. विजयी संघात कर्णधार ऋषिकेश डोंगरे, उपकर्णधार अलेन वर्तीसे, अभिषेक पवार, आयुष भालेराव, पियुष चौधरी, आकीफ खान, अर्णव सत्त्वाधार, अनुज पठाडे, तेजस इंगोले, सारीम बेग, सुरडकर आदित्य, सूर्यवंशी कृष्णा, आर्यन बोर्डे, देव हरीश, ओम पुंड, कुरे नागेश्वर या खेळाडूंचा समावेश आहे. या यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक डी एल राठोड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
एस एफ एस शाळेचे मुख्याध्यापक फादर संजय रूपेकर, उपमुख्याध्यापक नाझीम शेख, पर्यवेक्षक संदीप शेरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.एस एफ एस हायस्कूलच्या या विजयामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.



