नंदुरबार ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार आयोजित जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धा श्रीमती एच जी श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथे उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथींमध्ये जिल्हा क्रीडाधिकारी ओंकार जाधव, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, शांताराम पाटील तसेच स्पर्धा संयोजक मनीष सनेर, एस. एन. पाटील, जगदीश वंजारी, योग प्रशिक्षक तेजस्विनी चौधरी, कल्पेश बोरसे, घनश्याम लांबोळे, किरण बेडसे उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध शाळांमधून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचा प्रभावी परिचय दिला. शालेय स्तरावरील या स्पर्धेतून एकूण ३६ उत्कृष्ट खेळाडूंची निवड नाशिक विभागीय शालेय योगासन स्पर्धा साठी करण्यात आली आहे. हे खेळाडू नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीष सनेर यांनी मानले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाची आवड वाढली असून, नंदुरबार जिल्ह्याचा नाशिक विभागीय स्तरावर ठसा उमठवण्याची संधी निर्माण झाली आहे.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू
१४ वर्षांखालील मुले : खगेन्द्र पाटील, करण धनगर, अतुल वळवी, निलेश धनगर, मीत चौधरी, जीवन पाटील
१४ वर्षांखालील मुली : तेजस्वी बागुल, आकांक्षा कोकणी, मानसी कोकणी, वैष्णवी वळवी, प्राप्ती पाटील
१७ वर्षांखालील मुले : गुणवंत गिरासे, चैतन्य बोरसे, अक्षय वळवी, सोन्या राऊत
१७ वर्षांखालील मुली : मृणाली कुवर, मोक्षा लोढा, प्रतिमा वसावे, दिव्या पाटील, जानवी गुरव
१९ वर्षांखालील मुले : योगेश धनगर, संकेत पाटील, ईशांत पाटील, लोकेश कोळी
१९ वर्षांखालील मुली : सोनश्री पाटील, रोहिणी खुळे, आरुषी लोहार



