शेवगाव ः महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन मुंबई या अधिकृतसंघटनेशी संलग्न असलेल्या अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय कॅडेट व सिनियर स्पर्धेसाठी शेवगाव तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या ज्ञान माऊली अकॅडमीचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील वाडिया पार्क येथे होणारी जिल्हास्तरीय स्पर्धा वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा सचिव संतोष बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या स्पर्धेत शेवगाव तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या स्वर्णिमा नलवडे, मयूरी केदार, आराध्या ढवळे, क्षितिज क्षीरसागर, अक्षद क्षीरसागर, कार्तिक कुरुकवाड हे विद्यार्थी शेवगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे विद्यार्थी शेवगाव तालुका तायक्यांदो असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक, नॅशनल पंच गोरक्ष गालम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानमाऊली तायक्वांदो अकॅडमीमध्ये नियमित सराव करत आहेत.


