छत्रपती संभाजीनगर ः जळगाव येथे महाराष्ट्र ज्यूदो संघटनेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वाळूज एमआयडीसी भागातील बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्यूदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू ज्ञानेश्वरी अंबादास जाधव हिने ज्यूदो खेळाचे शानदार प्रदर्शन करत ज्युनियर गटात रौप्य पदक पटकावले.
या चमकदार कामगिरीबद्दल ज्यूदो क्लबच्या वतीने ज्ञानेश्वरी जाधवचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. ज्ञानेश्वरीला मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, रामकिशन मायंदे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भीमाशंकर नावंदे, दिप्ती शेवतेकर, झिया अन्सारी, विजय साठे,अमित साकला, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तू पवार, कुणाल गायकवाड तसेच बजाजनगर क्रीडा मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, सुधीर काटकर, सागर घुगे, हर्षल महाजन, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



