दिव्यांग ‘एलआयसी चषक’ दिल्लीने दणक्यात जिंकला

  • By admin
  • November 9, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

मुंबई : लोकेश रावतच्या दणकेबाज नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेत हरियाणाचा ९ विकेट राखून पराभव करीत दणक्यात एलआयसी चषक जिंकला. देशातील १६ आघाडीचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

मुंबईतील पी जे हिंदू जिमखान्यावर झालेल्या फायनलमध्ये हरियाणाने देवदत्तच्या नाबाद ६७ जोरावर १५ षटकात १५५ धावा केल्या. त्याला स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुलमदिनने (४४) चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर लोकेश कवटने ३८ चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्यात १० षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. दिल्लीने ११ ओव्हरमध्ये १ विकेटच्या मोबदल्यात १५६ धावा करीत दिल्लीला विजेतेपद मिळवून दिले. रावतला मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने गौरविण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकल चॅलेंज्ड संघटनेचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे, अनिल जोगळेकर, खजिनदार राजेश पाटील, सचिव विनायक धोत्रे, वरिष्ठ सदस्य मीनल पोतनीस, तसेच एलआयसीचे रिजनल मॅनेजर राजेश कुमार सुखदेव, नरेंद्र सुर्वे, सदाशिव पटनाईक, पीआरओ संदेश भुटाला, महावितणचे संचालक वाघीरकर, क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.

संक्षिप्त निकाल : हरियाणा १५ षटकात ४ बाद १५५ (देवदत्त नाबाद ६७, गुलबदिन ४४, अजय यादव २०/१, अजय भाटीया २९/१) पराभूत विरुद्ध दिल्ली ११ षटकात सर्वबाद १५६ (रावत कवट नाबाद ९७, अभिषेक भाटिया २७, अमकचंद २३/०).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *