नंदुरबार ः महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली व हिंगोली जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या वतीने हिंगोली येथे सब-ज्युनियर गटातील राज्यस्तरीय आर्चरी (मुले-मुली) अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा आर्चरी संघटनेचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
या खेळाडूंचा संघ रवाना करण्यापूर्वी एस ए मिशन हायस्कूल नंदुरबार येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्या नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, जिल्हा आर्चरी संघटनेचे अध्यक्ष डॉ मयुर ठाकरे, उपाध्यक्षा मीनल वळवी, सचिव राजेश्वर चौधरी, पर्यवेक्षिका वंदना जांभिळसा, क्रीडा शिक्षक शारदा पाटील, सतीश सदाराव आणि खुशाल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आर्चरीसारख्या खेळात संघटनेच्या स्पर्धेतून करिअरची संधी उपलब्ध होते. मिशन स्कूलचा क्रीडा विभाग सदैव संघटनेच्या चांगल्या कार्यात सहकार्य करीत आला आहे. प्रशिक्षक आणि खेळाडूंनी परिश्रम घेऊन राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे,” असे त्या म्हणाल्या.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या नंदुरबार जिल्हा संघात स्वप्नील संजय पावरा (एस ए मिशन हायस्कूल, नंदुरबार), विराज सुभाष नागरे (एच जी श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार), संदेश राजेंद्र पावरा (एस ए मिशन हायस्कूल, नंदुरबार),
वेदांत सावळीराम करिया (एस ए मिशन हायस्कूल, नंदुरबार), हर्षल गोरखनाथ बिरारे (एकलव्य विद्यालय, नंदुरबार), वैभव नीलेश गावित (डी आर हायस्कूल, नंदुरबार), आदेश सचिन पाटील (डी आर हायस्कूल, नंदुरबार), सुहानी स्वप्नील डोंगरे (एस ए एम इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार), श्रावणी राजेंद्र अहिरे (एस ए मिशन हायस्कूल, नंदुरबार), सुनील पाडवी (यशवंत विद्यालय, नंदुरबार) या सर्व खेळाडूंना जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव राजेश्वर चौधरी यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.



