कन्नड ः नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षक व अधिकारी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतून व्हॉलीबॉल खेळासाठी प्रवीण शिंदे यांची विभागीय संघात निवड झाली आहे. एकूण बारा खेळाडूंच्या संघातून प्रवीण शिंदे यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन करून आपले स्थान पक्के केले.
या स्पर्धेदरम्यान प्रवीण शिंदे यांनी सर्व्हिस, ब्लॉकिंग व कोर्टवरील अचूक समन्वयाने संघाला महत्त्वाची साथ दिली. निवड समितीत राष्ट्रीय खेळाडू एजाज शहा व विशाल दांडेकर यांनी सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
या निवडीच्या वेळी गटशिक्षणाधिकारी मोहम्मद सबाहत, शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, कार्यालयीन अधीक्षक अशोक जाधव, नागापूर केंद्रप्रमुख राहुल इंगोले, निंबा साळुंखे, विनोद राठोड आणि पवार यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले.
प्रवीण शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सदस्य असून कन्नड तालुका क्रीडा संकुल समितीवर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते उंबरखेडा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडविले आहेत.
या निवडीबद्दल तालुका क्रीडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी, योगेश पाटील, गोस्वामी कडूबा चव्हाण, विजयसिंग बारवाल, श्याम खोसरे, रवीकुमार सोनकांबळे, राकेश निकम, उमेश हुकुमदार, अतुल द सोडे, पांडुरंग सुपेकर, मनोज रायसिंगे, प्रदीप पवार आणि फुरकान शेख यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.



