छत्रपती संभाजीनगर ः क्रीडा व युवक सेवा संचानालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात एवरेस्ट माध्यमिक विद्यालयाच्या मुद्दसिर पटेल याने कांस्यपदक पटकावले.
अंतिम सामन्यात केंब्रिज स्कूलच्या वीर सारडा याच्याकडून २-० ने मुद्दसिर याचा पराभव झाला. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याची विभागीय शालेय स्क्वॉश क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुद्दसिर याला डॉ रोहिदास गाडेकर आणि डॉ कल्याण गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या शानदार यशाबद्दल शाळेच्या संचालिका सीमा कादरी, मुख्याध्यापिका सय्यदा तलत अबेती, क्रीडा शिक्षक अब्दुल वसेखान व शिक्षक वृंद अभिनंदन केले.



