पोलिस परिक्षेत्रीय क्रीडा महोत्सवास शानदार प्रारंभ

  • By admin
  • November 10, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

खेळाडूंच्या उत्साहाने गजबजले देवगिरी क्रीडा संकुल; शिस्त, संघभावना आणि खेळाडूपणाचा संगम

छत्रपती संभाजीनगर ः पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित ३६ वी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेला रविवारी (९ नोव्हेंबर) शानदार सुरुवात झाली. देवगिरी क्रीडा संकुल व भारत बटालियनच्या मैदानावर झालेल्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, बीड, जालना व धाराशिव या जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला व पुरुष खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस उपायुक्त (मुख्यालय) शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग, तसेच राखीव पोलीस निरीक्षक प्रल्हाद राठोड, राखीव पोउपनि. सतीश मुत्याल, क्रीडा प्रमुख राजेंद्र घुनावत आणि आसिफ शेख आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन व आयोजन छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

महिला विभागातील निकाल

५००० मीटर धावणे : बीडच्या शिवानी देशमुख हिने २२.४८ मिनिटांत प्रथम क्रमांक पटकावला, तर जालना जिल्ह्याच्या सरला कदम द्वितीय व बीडच्या प्रियंका जारवाल तृतीय स्थानी.

८०० मीटर धावणे : छत्रपती संभाजीनगर शहराच्या शितल जोनवाल प्रथम (२.४७ मिनिटे), जालन्याच्या रेणुका सावंत द्वितीय (२.५२) व संभाजीनगर ग्रामीणच्या काजल रंधवे तृतीय (२.५३).

१०० मीटर धावणे : शहराच्या सोनाली पवार हिने १४.९६ सेकंदात सुवर्ण, ग्रामीणच्या अंजली पवार रौप्य, तर बीडच्या शिल्पा नाहकर कास्य पदक पटकावले.

लांब उडी : बीडच्या शिल्पा नाहकर हिने ४.४१ मीटर अंतर उडी मारून प्रथम क्रमांक, शहराच्या तेजल पवार द्वितीय व स्वाती गाडेकर तृतीय स्थानी.

भालाफेक : शहराच्या नेहा वाळुंज हिने १८.७२ मीटर फेकून सुवर्ण पदक जिंकले.

१०० मीटर हर्डल्स : शहराच्या शिवरानी गुडुप प्रथम (२४.४९ सेकंद), बीडच्या प्रांजली वखरे द्वितीय, धाराशिवच्या बेबीताई वाहुळे तृतीय.

बास्केटबॉल महिला स्पर्धा : छत्रपती संभाजीनगर शहर संघाने बीड संघावर ३०-०७ अशा फरकाने विजय मिळवला.

पुरुष विभागातील निकाल

५००० मीटर धावणे : शहराच्या मोबीन पटेल प्रथम (२०.२८ मिनिटे), बीडच्या गोविंद नायकुडे द्वितीय व धाराशिवच्या यादव मोरे तृतीय.

८०० मीटर धावणे : शहराच्या परवेज सय्यद प्रथम (२.२२ मिनिटे), जालन्याच्या बळीराम वाजड द्वितीय व ग्रामीणच्या संजय जारवाल तृतीय.

१०० मीटर धावणे : शहराच्या बाबासाहेब मंडलीक प्रथम (११.५० सेकंद), धाराशिवच्या परम जाधव द्वितीय, तर ज्ञानेश्वर बोडखे तृतीय.

लांब उडी : ग्रामीणच्या योगेश दराडे प्रथम, शहराच्या कृष्णा घोडके द्वितीय, धाराशिवच्या सचिन पवार तृतीय.

भालाफेक : जालन्याच्या शुभम पाटील प्रथम (५७.६८ मी.), ग्रामीणच्या कृष्णा पवार द्वितीय व शहराच्या विकास जाधव तृतीय.

११० मीटर हर्डल्स : धाराशिवच्या ज्ञानेश्वर बोडखे प्रथम (२०.७६ सेकंद), शहराच्या शफीक शेख द्वितीय व ग्रामीणच्या अजीम शेख तृतीय.

बास्केटबॉल पुरुष : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण संघाने जालन्यावर २९-०६ ने विजय मिळवला.

हॉकी स्पर्धा : धाराशिव संघाने बीडवर ५-० तर संभाजीनगर ग्रामीणने जालन्यावर ७-० अशा फरकाने विजय मिळवला.

हॅण्डबॉल स्पर्धा : बीड संघाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणवर १४-१२ ने व शहर संघाने धाराशिववर १९-०१ ने विजय मिळवला.

फुटबॉल स्पर्धा : छत्रपती संभाजीनगर शहर संघाने धाराशिववर ०७-०० ने मात करत स्पर्धेची विजेतेपदाची झेप घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *