आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेला येत्या गुरुवारपासून प्रारंभ

  • By admin
  • November 10, 2025
  • 0
  • 48 Views
Spread the love

मुंबई ः गिरनार चहा पुरस्कृत आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त मुंबईमधील १६ नामांकित रुग्णालयीन क्रिकेट संघाचा सहभाग असलेल्या आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेला १३ नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क येथे सुरुवात होत आहे.

यंदा ३२ व्या वर्षात स्पर्धा पदार्पण करत असून स्पर्धेचे उद्घाटन १३ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानातील बंगाल क्रिकेट क्लब येथे भारताचे माजी क्रिकेट खेळाडू प्रवीण आमरे‌ यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे. या प्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे‌ नवनिर्वाचित मॅनेजिंग कमिटी आणि ऍपेक्स कमिटीच्या सदस्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.

उद्घाटन समारंभात गिरनार क्रिकेट स्पर्धा समितीचे मार्गदर्शक अरमान मलिक आणि सूरज समत सर्व संघाना मार्गदर्शन करतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे चेअरमन जॉय चक्रवर्ती, प्रेसिडेंट डॉक्टर श्रीखंडे, सरचिटणीस जाफरी, खजिनदार मिलिंद सावंत, सहचिटणीस अनिल बैकर हे विशेष परिश्रम घेत आहेत.
गतवर्षी एलिट गटात कोकिलाबेन संघाने विजेतेपद तर टाटा संघाने उपविजेतेपद मिळवले होते. प्लेट गटात ‌‌हिंदुजा संघाने विजेतेपद मिळवले होते तर ग्लेनेलगेस संघ उपविजेता ठरला होता. यंदा कोकिलाबेन, टाटा, हिंदुजा, ग्लेनेलगेस, नानावटी, लीलावती, जसलोक ,जेजे, रहेजा, बॉम्बे, सायन, ब्रीच कँडी, केएम, सोमय्या, नायर, सेव्हन हिल्स या रुग्णालीयन संघात लढती रंगणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *