छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी स्कूलमध्ये आयोजित २४ व्या कॅडेट (वय १२ ते १४) वयोगटातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर हौशी तायक्वांदो संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत मुलांच्या तुलनेत मुलींच्या वजनी गटातील स्पर्धा अधिक चुरशीच्या ठरल्या.
या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड आता आगामी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्य तायक्वांदो संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे सचिव नीरज बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा अत्याधुनिक डिजिटल पद्धतीने सेन्सरवर घेण्यात आली आणि त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक झाली.
बक्षीस वितरण राष्ट्रीय खेळाडू व पंच लता कलवार, अमोल थोरात आणि चंद्रशेखर जेऊरकर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय पंच अंतरा हिरे, कोमल आगलावे, सागर वाघ, शरद पवार, यश हिरे आणि सोमेश नंद गवळी यांनी पंच म्हणून मोलाची कामगिरी बजावली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रतीक जांभुळकर, श्रेया पराडकर, प्रथमेश शिंदे, हर्षल भुईंगळ, जयेश पठारे, अनुराग शेरे, रूपाली तुपारे आदींनी परिश्रम घेतले.
पदक विजेते खेळाडू
सुवर्ण पदक ः धनश्री घुगे, आराध्या जाधव, अन्वी पटेल, अमृता पवार, श्रावणी सोमवशी, लावण्या बेडसे, रोहिणी सहानी, ऋग्वेदी कुलकर्णी, अनया महाजन, आकांक्षा नागरगोजे, विवेक जाधव, आदित्य वनारसे, देवेश राऊत, अखिलेश आवटे, सुभाषित बेहरा, सिद्धेश गुप्ता, श्रीयोग शेळके.
रौप्यपदक ः नेत्रा गव्हाणे, जानवी शेळके, ऋतुजा पखे, आर्या दाभाडे, गौरी चव्हाण, तन्वी ढलपे, समीक्षा राठोड, राशी चौधरी, धनराज विभुते, कार्तिक आव्हाळे, स्वराज चव्हाण, वेद थोरात, सौम्या करंगळे, उदित नारळे.
कांस्य पदक ः ईश्वरी मते, वेदिका पखे, आर्या भडगावकर, प्रेरणा मते, गौरवी अस्वर, शितल पठाडे, सौम्या भंगार देरे, श्रावणी तुपे, कादंबरी संघा पाटील, देवांश टाकळकर, सिद्धेश गोसावी, आर्यन राजपूत, अंशुमन गोजे, सार्थक कोलते, दुर्गेश गोकुळ पुरे, श्लोक गवाडे, तन्मय मनावर, श्रेयश ढेरे, आरुष दळवी.


