छत्रपती संभाजीनगर ः मनमाड, नाशिक येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अभिजीत राऊत या खेळाडूने नेत्रदीपक यश मिळवले आहे.
१९ वर्षांखालील वयोगटातील ७१ किलो वजनी गटात अभिजीतने एकूण २२३ किलो वजन उचलून तृतीय क्रमांक (कांस्यपदक) पटकावले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
छत्रपती संभाजीनगर वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ वैद्य, सचिव दीपक रुईकर, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी माईन्दे आणि माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांनी अभिजीतचे विशेष अभिनंदन केले.
प्रशिक्षक तुषार सपकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन अभिजीतला लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून भाऊसाहेब खरात आणि सानिका झरेकर यांनी जबाबदारी चोख पार पाडली. या यशाने छत्रपती संभाजीनगरचे नाव वेटलिफ्टिंगमध्ये अधिक उंचावले आहे.



