आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजबीरसिंग, मार्तंड चेरले करणार नांदेडचे नेतृत्व
नांदेड ः महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अंतर्गत अहिल्यानगर धनुर्विद्या संघटनेच्या वतीने १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित २२व्या राज्यस्तर सिनियर धनुर्विद्या स्पर्धेसाठी नांदेडचा संघ प्रशिक्षक आणि सचिव वृषाली पाटील जोगदंड यांनी जाहीर केला.
कंम्पाऊंड प्रकारात अंतरराष्ट्रीय खेळाडू तेजबीरसिंग जहागीरदार व राष्ट्रीय खेळाडू मार्तंड चेरले, अथर्व जोंधळे, आकाश गायकवाड, अंकुश लांडगे यांची निवड करण्यात आली. रिकर्व्ह प्रकारात अजय राठोड आणि इंडियन प्रकारात रविकांत चव्हाण यांची निवड चाचणीतून निवड करण्यात आली.
निवड चाचणीचे उद्घाटन जिल्हा संघटनेचे सदस्य संजय चव्हाण, तालुका कोषाध्यक्ष मालू कांबळे यांनी केले. तर निवड झालेल्या खेळाडूंचे नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन उपाध्यक्ष हरजींदरसिंग संधू, डॉ हंसराज वैद्य, श्रीनिवास भुसेवार, सरदार चरणकमलजीतसिंग जहागीरदार, मुन्ना कदम कोंडेकर, बालाजी चेरले, शिवाजी पुजरवाड, जिल्हा संघटना कोषाध्यक्ष सुरेश तमलुरकर, सिद्धेश्वर शेटे, प्रशांत गवळे, संतोष चुनोडे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा संचालक म्हणून मनोज कोलते, सिद्धांत सावंत व स्वयं कांबळे यांनी काम पाहिले. अहिल्यानगर येथे निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.


