जिल्हास्तरीय स्पर्धेत ११ पदकांची कमाई
ठाणे ः दहाव्या जिल्हास्तरीय कॅडेट व सिनियर तायक्वांदो स्पर्धेत एक्सलेंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत आपला दबदबा कायम ठेवला. अकादमीच्या खेळाडूंनी ३ सुवर्णपदक, ३ रौप्यपदक आणि ५ कांस्यपदकांची कमाई करुन स्पर्धा गाजवली.
पेंडुलकर मंगल कार्यालय, बदलापूर (पूर्व) येथे ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटना व स्पार्टन्स तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कॅडेट व सिनियर तायक्वांदो स्पर्धेत एक्सलेंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत अकॅडमीच्या १६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला, त्यापैकी ११ खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिर्डी (अहिल्यानगर) येथे निवड झाली आहे. खेळाडूंना राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी खेळातील बारकावे, सेंसर प्रणालीचे आधुनिक तंत्र आणि स्पर्धेपूर्व तयारी करून घेतली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व एक्सलेन्ट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक निरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच लता कलवार, तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलील झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य श्रीकांत शिवगण, सागर गरवालिया, प्रमोद कदम यांनी राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अंतिम निकाल
कॅडेट गट ः १. श्लोक नेगी – सुवर्णपदक (६१ किलो खाली वजन गट), २. क्षितिजा पाटील – सुवर्णपदक (४१ किलो खाली वजन गट), ३. मंथन रावत – सुवर्णपदक (५९ किलो खाली वजन गट), ४. निती वेलानी – रौप्यपदक (५९ किलो वरील वजन गट), ५. आदित्य सुरेंद्रन – रौप्यपदक (५९ किलो वरील वजन गट), ६. दक्ष तोमार – कांस्यपदक (५९ किलो वरील वजन गट).
पूमसे प्रकार ः १. विवान माने – कांस्यपदक, २. श्रुतीप्रज्ञान साहु – कांस्यपदक.
सिनियर गट ः १. झीनल दाबी – रौप्यपदक (५७ किलो खाली वजन गट), २. आदित्य सिंग – कांस्यपदक (७४ किलो खाली वजन गट), ३. करण घारे – कांस्यपदक (८० किलो खाली वजन गट).
सहभाग — स्वरा मोहिते, खुशी तिवारी, क्रिष्णा शुक्ला, सावी खोपकर आणि मंथन वापीलकर यांनीही उत्कृष्ट खेळ करून आपले कौशल्य दाखवले.


