वयाची बंधने तोडत शिक्षकांनी गाजवले खेळाचे मैदान

  • By admin
  • November 12, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

अहिल्यानगर ः ज्ञानदानाचे कार्य करत विद्यार्थी घडविणारे शिक्षक वयाची बंधने तोडून मैदानावर उतरले व मैदान गाजवले देखील. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था संगमनेर यांच्यामार्फत आयोजित शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या ठिकाणी उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी कुसुम कुमारी कानडी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश सूर्यवंशी, विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता वाजे, केंद्र प्रमुख माणिक आढाव, भाऊसाहेब शिर्के, लक्ष्मण ठोंबरे, दत्ता कडूस, बाबासाहेब माने, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार, विशेष शिक्षक आणि तालुक्यातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी असणारे शिक्षक कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक व शिक्षिका खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे शिक्षक व शिक्षिका खेळाडूंचे कौतुक होत आहे. 

सर्व खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पंच म्हणून या ठिकाणी बापूराव गायकवाड संदीप घावटे, अक्षय शिंदे, कैलास ढवळे, कल्पक राऊत, सचिन जामदार यांनी काम पाहिले.

अंतिम निकाल 

१०० मीटर धावणे – संदेश शेळके व लता गवळी. गोळा फेक – बापू करपे, पिंकी पाचांगणे. थाळी फेक – सतीश बोरुडे, शारदा दिवटे. लांब उडी – अमोल कातोरे.भालाफेक – सचिन जामदार, शारदा दिवटे. बॅडमिंटन – विकास चौधरी, कांता मांडगे. खो-खो – सुधीर राऊत. व्हॉलीबॉल – सचिन जामदार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *