शेवगाव ः अहिल्यानगर बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत शेवगाव तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या ज्ञान माऊली तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थीनी स्वर्णिमा नलवडे हिची राज्य पातळीवर निवड झाली आहे.
अहिल्या नगर जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क येथील बॅडमिटन हॉलमध्ये संपन्न झाली. स्पर्धेमध्ये स्वर्णिमा नलवडे हिने नेत्रदिपक कामगिरी करुन सुवर्णपदक जिंकले. तिने ज्ञानमाऊली तायक्वांदो अकॅडमीमध्ये अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीमध्ये सराव करुन हे यश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेमध्ये क्षितिज क्षीरसागर व मयुरी केदार यांना पराभव स्वीकारावा लागला. १३ ते १५ नोव्हेबर रोजी शिर्डी येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्वर्णिमा नलवडे हिने आपले स्थान निश्चित केले. १४ वर्षांखालील मुलींच्या ५५ ते ५९ वजन गटामध्ये राहता येथील प्राप्ती राऊत हिच्याशी कडवी झुंज देत तिने यश मिळविले.
महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे, अल्ताफ कडकाले, शेवगाव तालुका तायक्वांदो असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक गोरक्ष गालम, ज्ञान माऊली अकॅडमीचे अध्यक्ष प्रा. नवनाथ सुडके, युवराज सुडके, महेशकुमार नलवडे, मार्गदर्शक अविनाश हंडाळ आदींनी तिचे कौतुक केले आहे. तिच्या या यशामागे ज्ञान माऊली अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक गोरक्ष गालम यांचा मोठा वाटा आहे. शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ती अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.



