छत्रपती संभाजीनगर ः जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत श्री सरस्वती भुवन कला-वाणिज्य महाविद्यालय व सरस्वती भुवन मुलींच्या वसतिगृहाची विद्यार्थिनी शुभांगी शेषराव शिंपी हिने कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
ही स्पर्धा शहरातील विभागीय क्रीडा संकुलात पार पडली. या निमित्ताने श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळकृष्ण क्षीरसागर यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करून कौतुक केले. याप्रसंगी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ श्रीरंग देशपांडे, सहचिटणीस डॉ रश्मी बोरीकर, वसतिगृह प्रमुख नम्रता इनामदार यांची उपस्थिती होती.



