एक्सलेंट तायक्वांदो अकॅडमीच्या विशेष खेळाडूंची चमकदार कामगिरी 

  • By admin
  • November 12, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

ठाणे ः दहाव्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एक्सलेंट तायक्वांदो अकॅडमीच्या ऑटिझम विशेष खेळाडूंची चमकदार कामगिरी राहिली. 

पेंडुलकर मंगल कार्यालय, बदलापूर (पूर्व) येथे पार पडलेल्या १०व्या जिल्हास्तरीय कॅडेट व सिनियर तायक्वांदो स्पर्धेत एक्सलेंट तायक्वांदो अकॅडमीच्या ऑटिझम व डाउन सिंड्रोम असलेल्या विशेष खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले एक्सलेंन्ट तायक्वांदो अकॅडमी ही ऑटिझम व डाउन सिंड्रोम असलेल्या विशेष खेळाडूंना प्रशिक्षण देणारी पहिली अकॅडमी आहे. दिव्यांग खेळाडूंच्या बरोबरीने आता विशेष खेळाडूंना देखील मानसन्मानाने समाजामध्ये स्थान मिळावे हे ध्येय असून हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.

या खेळाडूंनी पूमसे प्रकारात आपली प्रतिभा आणि जिद्द सिद्ध केली. ही स्पर्धा ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटना व स्पार्टन्स तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विशेष खेळाडूंनी तायक्वांदो या लढाऊ खेळामध्ये आपली निष्ठा आणि आत्मविश्वास दाखवत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर आणि कांचन गवंडर यांनी खेळाडूंना पूमसे प्रकारातील आवश्यक तंत्र, शारीरिक समन्वय आणि स्पर्धेपूर्व तयारी करून दिली होती व ऑटिझम खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे व अकॅडमीचे आभार व्यक्त मानले, हे सर्व विशेष खेळाडू येणाऱ्या काळात भारताचे प्रतिनिधीत्व करतील गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी स्पर्धेत प्रसंगी उपस्थितांना सांगितले.

विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सर्व विजयी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करताना, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व एक्सलेंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक निरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच लता कलवार, तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलील झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य श्रीकांत शिवगण, सागर गरवालिया, प्रमोद कदम यांनी राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विजेते विशेष खेळाडू

इश्वाकु वशिष्ट, झीशान मोंडाल, ईशान गोयल, अक्षय गुप्ता, प्रिन्स चतुर्वेदी, आशुतोष तिवारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *