माऊली क्रिकेट अकॅडमी संघ उपविजेता
नाशिक : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित पहिली राज्यस्तरीय डॉक्टर अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक येथील एमसीए क्रिकेट अकॅडमी मैदानावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एटीएम क्रिकेट अकॅडमी, पालघर संघाने विजेतेपद पटकावले, तर माऊली क्रिकेट अकॅडमी उपविजेती ठरली. अहिल्यानगर वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेसाठी राज्यातील २१ संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास गिरी, तसेच राज्यातील अनेक डॉक्टर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. उद्घाटनावेळी मीनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट खेळातील नियम व खेळाडूंच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन केले.
अंतिम सामन्यात एटीएम पालघरने माऊली क्रिकेट क्लबचा पराभव करत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कारही देण्यात आले.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष विलास गिरी, महिला अध्यक्ष धनश्री गिरी, तसेच डॉ जे बी भोर, डॉ राजीव शिंदे, डॉ निलेश होळ, डॉ उत्तम भोर, डॉ अमोल कदम, डॉ हर्षद खारुडे, डॉ गणेश गावडे, डॉ राहुल जाधव, डॉ धनेश वायकर यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दर्शन थोरात, सत्यम पांडे, धनश्री गिरी, दिव्येंदु बागुल, सोमा बिरादार, विजय उंबरे, हर्ष चौधरी, महेंद्र देशमुख, धनंजय लोखंडे, सुनील मोर्ये, संदीप पाटील, आनंद शिरस्ता, मयूर कोष्टी आणि कुणाल हळदणकर यांनी पंच व संयोजक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेने राज्यातील डॉक्टर समुदायामध्ये क्रीडा संस्कृती वाढविण्याचे नवे उदाहरण निर्माण केले असून, या माध्यमातून आरोग्य, एकता आणि क्रीडाभावना यांचे सुंदर दर्शन घडले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
मालिकावीर : बीरबहादुर यादव
सर्वोत्कृष्ट फलंदाज : अविनाश गरडे
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : रोहित किणी



