सातारा ः राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी बुद्धिबळाची चाल पटावर खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संस्कृती विकास मोरे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होणवडजकर (नांदेड), राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ निलकंठ श्रावण (हिंगोली) हे दोघे तांत्रिक समिती सदस्य म्हणून उपस्थित होते. तसेच सातारा जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे खजिनदार मनोजकुमार तपासे यांचीही उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर या ८ विभागातील एकूण २४० स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून १४, १७ व १९ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांना आपल्या रणनीती, बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेत पंच म्हणून कार्यभार मुख्य पंच इंटरनॅशनल आर्बिटर शार्दूल तपासे, उपमुख्य पंच इंटरनॅशनल आर्बिटर श्रद्धा विंचवेकर हे पाहणार आहेत. तसेच फिडे आर्बिटर योगेश रवंदळे, फिडे आर्बिटर यश लोहाणा, सीनियर नॅशनल आर्बिटर अपर्णा शिंदे, सीनियर नॅशनल आर्बिटर रोहित पोल, सीनियर नॅशनल आर्बिटर महादेव मोरे, आणि स्टेट आर्बिटर ओंकार ओतारी हे पंच म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अक्षय मारकड, सुनील कोनेवाडकर, सुमित पाटील, रवी पाटील, स्वयंसेवक म्हणून अंकिता शिंदे, आयुषी बारटके, अपूर्व देशमुख, अंजली जाधव, आशीष मालपाणी, राहुल घाटे, राघव डांगे, प्रदीप पाटील, अनुराज रस्कतला, गौरव म्हांगडे, यश गोडबोले, आणि इशाद शेख हे काम पाहणार आहेत.
या स्पर्धेला सातारा जिल्हा चेस असोसिएशन तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांचे सहकार्य लाभले असून, हा उपक्रम जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाच्या प्रसारासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.



