मुंबई ः तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठवी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा समावेश असलेला सबर्बन मुंबईचा तायक्वांदो संघ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती सचिव संदिप चव्हाण यांनी दिली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबईतर्फे १० नोव्हेंबर रोजी सेंट अँथनी हायस्कूल, साकीनाका येथे जिल्हा स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा आधुनिक सेन्सर पद्धतीने घेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा पारदर्शक पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका लीडा सॅन्टीस, आंतरराष्ट्रीय पुमसे प्रशिक्षक रॉबिन मेंजेस, तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबईचे पदाधिकारी संदीप येवले (अध्यक्ष), संदीप चव्हाण (सचिव), कल्पेश गोलांबडे (खजिनदार) आणि संतोष कुंभार (सदस्य), जगदीश अंचन यांच्या हस्ते करण्यात आले.
सबर्बन मुंबईचा तायक्वांदो संघ
अभिजीत देदीनाथ, महिमा थापा, अलिजा शेख, अथर्व सावंत, साहस भोजे, रुद्र रसाळ, आद्या शर्मा, तेजस भंडारी, संस्कार धोपटे, तनिष परब, अद्वेत रेडेकर, रोहन चव्हाण, पार्थ दामसे, रुद्र गोडसे, यश कारखेले, साहस भोजे, मोना रजक, आरोही दास, वेदा मोरे, शरीका खान, पलक दामसें, आफ्रिन शेख, साईशा शहाणे, दित्या पसुपुला, श्रीष्टी यादव, स्वरा खडमळे.



