खुलदाबाद ः खुलदाबाद येथील अल इरफान स्कूलचा विद्यार्थी अब्दुल सैहान खान याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (डेरवन) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेसाठी (अंडर १४) पात्रता मिळवली आहे.
मानवत (परभणी) येथे झालेल्या विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत अब्दुल सैहान खान याने उत्कृष्ट कामगिरी करत १०० मीटर आणि २०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक तसेच ८० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला. ही उल्लेखनीय कामगिरी कोच व क्रीडा शिक्षक कुरेशी मोहम्मद अख्तर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साध्य झाली.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच व्यवस्थापन समितीने अब्दुल सैहान खान आणि त्याचे प्रशिक्षक कुरेशी मोहम्मद अख्तर यांचे अभिनंदन केले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


