सासवड ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीतर्फे आयोजित आंतर-महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन (मुले) स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय, सासवड या महाविद्यालयाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक उपविजेतेपद पटकाविले.
स्पर्धेनंतर उपविजेतेपदाचा चषक प्रदान करून संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. अमेय काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संघाला प्रशिक्षक मयुर जांभळे आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ बी यू माने, डॉ संजय झगडे व रवी जाधव
यांनी संघाचे आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.
संघातील दोन गुणवंत खेळाडू प्रज्वल बोरकर व मयुर माने यांनी उत्कृष्ट खेळ सादर करून देवळा, नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती संघात स्थान प्राप्त केले आहे.


