छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत भागीरथी विद्यालयाच्या हर्षाली कुंटे हिने चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
विभागीय क्रीडा संकुल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या स्पर्धेत हर्षालीने १९ वर्ष वयोगटातील ४८ किलो वजन गटात सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या लढतींमध्ये तिने आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवत जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या नेत्रदीपक कामगिरीमुळे हर्षाली कुंटेची जालना येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेत ती भागीरथी विद्यालयाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे, ही विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
हर्षालीच्या या यशाबद्दल संस्थेचे कोषाध्यक्ष विशाल सुरासे यांच्या हस्ते तिचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
हर्षालीचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सचिव वाल्मिकराव सुरासे, उपाध्यक्ष विठ्ठल पैठणकर, प्राचार्य बी एम हजारे, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे सहसचिव अनिल मिरकर, क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर, तसेच सर्व संचालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा समावेश होता. हर्षालीने जालना येथेही सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याची शान वाढवावी, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
यशस्वी खेळाडूंचे प्रमोद पठारे, संचालक दत्तात्रय सुरासे, क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर, सुनील भवर, प्रमोद चव्हाण, राजेश्वर विभुते, गणेश जगताप, प्रमोद रिंढे, प्रवीण जाधव, मनीषा उभेदळ, सागर राजपूत, रोहिदास त्रिभुवन, भारत भोपळे, प्रवीण जाधव, निर्मला क्षीरसा, कटारे, गोकुळ पवार, जयश्री बोर्डे, सुरज साळवे, अधीक्षक मंजुषा सपकाळ, समाधान सुरासे, मंगेश दुतोंडे, दर्शन पाटील, ज्ञानदेव तायडे, किशोर साळुंखे, सुनील बोडखे, अमोल त्रिभुवन, विशाल साबळे, भगवान सुरासे आदी ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले.


