छत्रपती संभाजीनगर–जालना विभाग आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा उत्साहात 

  • By admin
  • November 15, 2025
  • 0
  • 85 Views
Spread the love

पीईएस कॉलेज क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत २५० खेळाडूंचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा पीईएस कॅम्पस येथे अत्यंत दिमाखात पार पडली. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून तब्बल २५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

उद्घाटन सोहळा भव्यदिव्य

या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक डॉ सचिन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी हे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ दयानंद कांबळे, डॉ हंसराज डोंगरे, डॉ माधवीसिंह इंगळे, डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ शेख अफसर, डॉ वसंत झडे, डॉ सुनील गायकसुमे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. स्पर्धेच्या दोन दिवसात खेळाडूंनी विविध धावणे, उड्या, फेक इत्यादी प्रकारांत दमदार कामगिरी सादर केली.

या स्पर्धेत पंच म्हणून सुरज मोरे, डॉ योगेश निकम, डॉ फिरोज सय्यद, डॉ सुहास यादव, डॉ मनीषा वाघमारे, डॉ रेखा राठोड, डॉ सीमा मुंढे, डॉ युवराज आंधळे यांनी काम पाहत सर्व खेळाडूंना निष्पक्ष न्याय दिला.

आयोजन समितीचे सचिव प्रा मंगेश डोंगरे व त्यांच्या टीममधील डॉ सूर्यकांत, डॉ संतोष कांबळे, डॉ सय्यद मजहर, डॉ गौतम गायकवाड, अनिल बागुल, अजित दाणे, मुत्तुजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे यांनी संपूर्ण स्पर्धा सुरळीतरित्या पार पाडण्यासाठी मोठे सहकार्य केले.

छत्रपती संभाजीनगर विभाग – विजेत्यांची यादी

पुरुष गट
८०० मीटर : अर्जुन शिंदे (प्रथम), रोहित सिंग (द्वितीय). भालाफेक : किरण सुरे (प्रथम), रणजित कोयडवर (द्वितीय). गोळाफेक : उदय जाधव (प्रथम), जोएल शेकू (द्वितीय). १०० मीटर धावणे : रणविजय मालकर (प्रथम), जगदीश जाधव (द्वितीय). ५००० मीटर : अंगत काहिरे (प्रथम), अतुल जाधव (द्वितीय).

४x४०० मीटर रिले : एसबीईएस -प्रथम. लांब उडी : अतुल जाधव (प्रथम), संकेत सोनवणे (द्वितीय). ४०० मीटर : रोहित (प्रथम), लाखन खवळ (द्वितीय). १०,००० मीटर: अजून शिंदे (प्रथम), तेजस राठोड (द्वितीय). थाळीफेक : पडवळ ओमकार (प्रथम), शेख मोहम्मद झुंझुफ (द्वितीय). १५०० मीटर : लक्ष्मण पवार (प्रथम), रोहित सिंग (द्वितीय). २०० मीटर: संकेत मदाने (प्रथम). हॅमर थ्रो : उदय जाधव (प्रथम), मिर्झा शेख अली (द्वितीय). ४x१०० मीटर रिले : पीईएस कॉलेज – प्रथम.

महिला गट

८०० मीटर : अमृता गायकवाड (प्रथम), कावेरी वप (द्वितीय). भालाफेक / गोळाफेक : सुरेखा आडे – दुहेरी सुवर्ण. १०० मीटर : तृप्ती गवळी (प्रथम), कविता कडे (द्वितीय). ५००० मीटर : गायत्री गायकवाड (प्रथम), वैष्णवी कटारे (द्वितीय). ४x४०० मीटर: डॉ बाबासाहेब आंबेडकर कला–वाणिज्य महाविद्यालय. लांब उडी : संजना राठोड (प्रथम), कांचन दानवे (द्वितीय). ४०० मीटर : रेवती तुपे (प्रथम), शाह राठोड (द्वितीय). १०,००० मीटर : सुहानी खोब्रागडे (प्रथम), चेतना मदकामी (द्वितीय). १५०० मीटर : अमृता गायकवाड (प्रथम), दीक्षा वाघ (द्वितीय). २०० मीटर : तृप्ती गवळी (प्रथम), श्रावणी कुलकर्णी (द्वितीय). हॅमर थ्रो : साक्षी बगाडे (प्रथम), दीक्षा मगर (द्वितीय). ४x१०० मीटर रिले : एसबीईएस विज्ञान महाविद्यालय – प्रथम

जालना विभाग – विजेत्यांची यादी

पुरुष गट

८०० मीटर : गणेश हंडके (प्रथम), भालाफेक : अमोल खांदेभरड (प्रथम).  गोळाफेक : राठी संजय (प्रथम). १०० मीटर : रोहन राठोड (प्रथम). ५००० मीटर : अजय गायकवाड (प्रथम). ४x१०० मीटर रिले : बारवाले महाविद्यालय – प्रथम. लांब उडी: अमोल जाधव (प्रथम). ४०० मीटर : गणेश बनकर (प्रथम). १०,००० मीटर : जयंत करडकर (प्रथम). १५०० मीटर : रोहित कापसे (प्रथम). २०० मीटर : रोशन राठोड (प्रथम).

महिला गट

८०० मीटर : किशिश चरवंदे (प्रथम). गोळाफेक: पल्लवी जाधव (प्रथम). १०० मीटर : कोमल दिव्या अवारे. लांब उडी : सानिका अंब्रे (प्रथम). ४०० मीटर : साक्षी अमकार (प्रथम). १५०० मीटर : गिरिजा टाकळकर (प्रथम). २०० मीटर : साक्षी अमकार (प्रथम). ४x१०० मीटर रिले : अंकुशराव टोपे महाविद्यालय – प्रथम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *