महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची ऐतिहासिक कार्यकारिणी जाहीर

  • By admin
  • November 15, 2025
  • 0
  • 154 Views
Spread the love

देवेंद्र फडणवीस मुख्य आश्रयदाते, अजित पवार अध्यक्षपदी, मुरलीधर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष

महासचिवपदी संजय शेटे यांची निवड, प्रदीप खांड्रे, उदय डोंगरे, शरद टिळक, निलेश जगताप सहसचिवपदी

मुंबई ः महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बहुचर्चित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य आश्रयदाते म्हणून निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अध्यक्षपदी आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. संजय शेटे यांची महासचिव म्हणून निवड झाली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक केवळ महाराष्ट्रातच नव्हे देशाच्या क्रीडा क्षेत्रात चर्चेचा केंद्रबिंदू बनली होती. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्य आश्रयदाते म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर पहिल्यांदा निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे चौथ्यांदा अध्यक्ष बनले आहेत. अजितदादा पवार हे २०१३ पासून सलग तीन वेळा अध्यक्ष पदावर आहेत.

२ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक मुंबईत होती. यावेळी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि अजितदादा पवार यांना संघटनेची कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार सुपूर्द केले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.

मुख्यमंत्री व मुख्य आश्रयदाते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि एमओएचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार व मान्यतेने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीचा कालावधी २०२५ ते २०२९ असा असणार आहे.

नूतन कार्यकारिणी

मुख्य आश्रयदाते ः देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), अध्यक्ष ः अजितदादा पवार (खो-खो), वरिष्ठ उपाध्यक्ष ः मुरलीधर मोहोळ (कुस्ती), महासचिव ः संजय शेटे (जिम्नॅस्टिक्स), खजिनदार ः अरुण लखानी (बॅडमिंटन).

उपाध्यक्ष ः संदीप जोशी (बास्केटबॉल), मनोज कोटक (याटिंग), स्मिता यादव (रोईंग), मनोज भोरे (हॉकी).

सहसचिव ः डॉ उदय डोंगरे (तलवारबाजी), डॉ प्रदीप खांड्रे (स्क्वॉश), शैलेश टिळक (ज्यूदो), निलेश जगताप (व्हॉलिबॉल).

कार्यकारिणी सदस्य – नामदेव शिरगावकर (मॉडर्न पेंटाथलॉन), सोपान कटके (वुशू), सतीश इंगळे (नेटबॉल), विक्रम रोठे (सायकलिंग), आशिष बोडस (टेबल टेनिस), राजीव देसाई (लॉन टेनिस), किरण चौगुले (फुटबॉल), लीना कांबळे (कबड्डी), राकेश तिवारी (बॉक्सिंग).

विशेष निमंत्रित सदस्य – अशोक पंडित, प्रदीप गंधे, दयानंद कुमार.

सहयोगी पदाधिकारी

प्रशांत देशपांडे (आर्चरी, सहयोगी उपाध्यक्ष), चंद्रजीत जाधव (खो-खो, सहयोगी उपाध्यक्ष), गोविंद मुथुकुमार (बास्केटबॉल, सहयोगी सहसचिव), संदीप भोंडवे (कुस्ती, सहयोगी सहसचिव). समीर मुणगेकर (कयाकिंग, सहयोगी सदस्य), प्रशांत बेंद्रे (वेटलिफ्टिंग, सहयोगी सदस्य), गफार पठाण (तायक्वांदो, सहयोगी सदस्य), संदीप चौधरी (रग्बी, कार्यकारिणी सदस्य).

ही नवीन कार्यकारिणी महाराष्ट्रातील खेळांच्या विकासाला आणि ऑलिम्पिक चळवळीला अधिक बळ देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *