जळगाव ः पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया व पॅरा स्विमिंग असोसिएशन तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप ही दिनांक १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत हैदराबाद येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्वज्ञ राहुल खैरनार व कांचन योगेश चौधरी यांची निवड महाराष्ट्र पॅरा स्विमिंग संघात निवड करण्यात आलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेतून त्यांची निवड करण्यात आली होती. दोन्ही जलतरणपटू हे जळगाव येथील मनपा जलतरण तलाव ऑक्वा स्पा येथे जलतरणाचा सराव करतात त्यांना विशेष प्रशिक्षण कमलेश नगरकर यांचे लाभले आहे. त्यांच्या या निवडीकरिता त्यांचे ऑक्वा स्पाचे सपन झुनझुनवाला, वॉटर स्पोर्ट्स सचिव राजेंद्र ओक यांनी अभिनंदन केले.


